टंकलेखन यंत्र अस्तित्वात आले तेव्हा सुरुवातीला त्यांच्यावर ईंग्रजी अक्षरांची मांडणी अक्षरानुक्रमे होती. सर्वात वरच्या ओळीत A, B, C, D या प्रमाणे. यांत्रीक टंकलेखन यंत्रात ज्या पट्ट्या कागदावर आपटून अक्षरे उमटतात त्या एकमेकांत फसण्याचे प्रमाण या सोप्या आराखड्यात खूप होते.
या वर उपाय म्हणून क्वर्टी आराखडा प्रचलीत झाला. यात सर्वात वरच्या ओळीत सुरुवातीचे ईंग्रजी अक्षरं Q,W,E,R,T,Y असे येतात म्हणून याचे नाव QWERTY KEYBOARD. यात पट्ट्या एकमेकांत फसण्याचे प्रमाण त्यामानाने बरेच कमी झाले. संगणक आल्यानंतर सर्वात प्रचलीत आराखडा म्हणून संगणकाच्या कळफलकावही तोच वापरला गेला आणि आजही हाच आराखडा सर्वात जास्त प्रचलीत आहे.
परंतु, या क्वर्टी आराखड्यामधे ईंग्रजी भाषा टंकताना एकाच पंजावर जास्त ताण येणे ई. तोटे आहेत. यावर डॉ. ऒगस्ट ड्वोरॅक आणि त्यांचे मेहुणे डॉ. विलियम डेलेय यांनी संशोधन केले आणि कळफलकावरील अक्षरांच्या स्थानाची अदलाबदल करुन एक नवा कळफलक आराखडा तयार केला. यात ईंग्रजी भाषा टंकताना दोन्ही मनगटांच्या स्नायुंचा समान उपयोग केला जातो त्यामुळे एकाच पंजावर जास्त ताण येत नाही.
यालाच ड्वोरॅक लेआऊट असे म्हणतात आणि सिंपलीफाईड ड्वोरॅक लेआऊट खालीलप्रमाणे दिसतो:

विकीपिडीया वरुन साभार.
यातही काही किरकोळ बदल करुन वेगवेग़ळ्या उगयोगासाठी वेगवेगळे ड्वोरॅक आराखडॆ बनवले गेलेले आहेत. तसेच अमेरीकन व ब्रिटीश ईंग्रजीतील फरकाप्रमाणेही वेगळे ड्वोरॅक आराखडॆ आहेत.
मला या बद्दल सर्वात आधी २00९ च्या आसपास समजले. त्यानंतर या आराखड्याबद्दल अजुन वाचले असता असे लक्षात आले की, काही चर्चांमधे याचा प्रचार करताना टंकन वेग वाढतो असा फायदा सांगत आहेत. जे पुर्ण सत्य नाही. त्यामुळे अनेक जन निराश होऊन याच्या विरुद्ध मत प्रदर्शन करताना दिसतात.
याचा मुख्य उपयोग संगणकाची आज्ञावली लिहिणे आणि या सारख्या ईतर भरपुर वेळ सलग टंकन करण्याची आवश्यकता असण्या-या व्यक्तींना आहे. आणि हाच मुख्य मुद्दा लक्षात घेऊन अतिंमत: मी हा आराखडा शिकण्याचा निर्णय घेतला. आधीचा क्वर्टी आराखडा मी थेट टंकनयंत्रावरच शिकलो असल्यामुळॆ आधीच मला खाली न बघता वेगात इंग्रजी टंकन करता येत होते. त्यामुळे नवीन आराखडा आत्मसात करणे सोपे गेले.
आंतरजालावर उपलब्ध असलेल्या कोणत्यातरी ड्वोरॅक आराखड्याचा सराव करण्याच्या संकेतस्थळावरुन मी सलग ३ दिवस बसुन हा आराखडा आत्मसात केला आणि मला तो लगेच जमला हे मला अजुनही आठवते आहे.
आपल्याला जर हा आराखडा वापरायचा असेल तर संगणकाच्या स्थापत्य मधे जाऊन कीबोर्ट सेटींग किंवा कीबोर्ड लेआऊट अशी सेटींग शोधा आणि तिथुन तुम्ही हा आराखडा तुमच्या कळफलकाच्या यादीत समाविष्ट करुन शकता. एका वेळी एकापेक्षा जास्त आराखडे ठेवण्याची सोय आहे पण कोणत्याही एका वेळेला एकच वापरता येतो. क्वर्टी मधुन ड्वोरॅक आणि परत बदल करण्यासाठी तुमच्या ओपरेटींग सिस्टीम नुसार एक कीबोर्ड शॉर्टकड असेल तो वापरु शकता.
ड्वोरॅक का वापरावा याबद्दल समर्थन करणार्या काही चर्चांमधे कार्पेल टनल सिन्ड्रोम याबद्दल माहिती मिळाली. पण क्वर्टीच्या सलग खुप वापरण्याने याचा किती टक्के लोकांना अनुभव येतो अशी काही आकडेवारी वाचायला मिळाली नाही.
तुम्ही पण हा आराखडा वापरुन बघा आणि सलग खुप वेळ टंकताना मनगटांना जास्त आराम वाटतो का ते बघा. मी जेव्हापासुन हा आराखडा वापरायला सुरुवात केली तेव्हापासुन् क्वर्टी पेक्षा मला हाच जास्त चांगला आणि वेगवान वाटला म्हणुन मी हाच वापरत आहे.