Which is Best IDE?
Which is Best Text Editor?
Why Emacs?
हे किंवा या अर्थाचे उत्तर शोधत असताना, कुठेतरी ईमॅक्स बद्दल तुम्ही वाचले असेल. त्यातुनच कदाचीत या लेखालाही भेट देत असाल. ग्नु ईमॅक्स हे एक मुक्तस्त्रोत शब्द संपादक (Open Source Text Editor) आहे. या लेखमालेत, ईमॅक्स म्हणजे काय, ओळख व त्याबद्दल शक्य ती माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
संगणकावार टिप्पण्या काढणे, लिखाण काम करणे व आज्ञावली लिहिणे या व अशा इतर अनेक कामांसाठी शब्दसंपादकाची (Text Editor) गरज असते. याच गरजेतुन ईमॅक्सची पहिली आवृत्ती इ.स. १९७६ मधे तयार करण्यात आली. नंतर या मुळच्या ईमॅक्सची नवी आवृत्ती रिचार्ड स्टॉलमन यांनी त्यांच्या ग्नु प्रकल्पासाठी बनवली. सर्वात जुन्या मुक्तस्त्रोत प्रकल्पांपैकी ईमॅक्स एक आहे. काही आधुनीक शब्दसंपादकांची नावे तुम्ही ऐकली असतील किंवा त्यापैकी काही वापरलेही असतील जसे की, नोटपॅड, एम.एस. वर्ड किंवा लिबरऑफिस वगैरे. ईमॅक्सही तसेच शब्दसंपादक आहे परंतु ईमॅक्समधे ब-याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने केल्या जातात. इतर शब्दसंपादकांच्या तुलनेत ईमॅक्समधे काय चांगले आहे व ईमॅक्स का वापरावे यावर अधिक माहितीसाठी इथे भेट द्या.
ईमॅक्स चालु केल्यावर दिसणारी सुरुवातीची स्क्रिन:

वरील स्क्रिनमधे Emacs Tutorial हा पर्याय निवडुन तुम्ही ईमॅक्स शिकण्यास थेट ईमॅक्समधुनच चालु करु शकता.
ईमॅक्स किज:
ईमॅक्सचा वापर करताना माउस चा वापर जवळजवळ नगण्य आहे. बहुतांश काम हे फक्त किबोर्ड वापरुनच होते. प्रत्येक कामासाठी एक किबोर्ड शॉर्टकट दिलेला असतो. सुरुवातीला हे सर्व किबोर्ड शोर्टकर्ट व त्यांचे संयोजन (combination) शिकणे कठिण वाटु शकते. पण सरावाने ते ही जमुन जाते. ओळींमधे वर खाली जाण्यासाठी किंवा वाक्यामधे डाव्या उजव्या बाजुल जाण्यासाठी ईमॅक्सची स्वतःचे किज आहेत, पण तुम्ही नेहमीचे अॅरो किजही वाजरु शकता.
ईमॅक्स किज बद्दल शिकताना अनेक ठिकाणी ‘मेटा कि’ दाबण्याबद्दल उल्लेख असेल. आधुनीक संगणकामधे ही मेटा की म्हणजे ALT Key होय. कंट्रोल कीला C व मेटा (ALT) की ला M असे लिहितात. जेव्हा एकापेक्षा अनेक कीज एकानंतर एक दाबुन एक संयोजन तयार करायचे असते तेव्हा ते – च्या चिन्हाने दाखवतात. उदाहरणादाखल काही नेहमी लागणारे किबोर्ड किज:
- C-x C-f ( ईमॅक्समधे नवीन फाईल उघडा )
- C-x s ( उघडलेल्या सर्व फाईल सेव्ह करा )
- C-x C-c ( ईमॅक्स पुर्णपणे बंद करुन बाहेर या )
नेहमी लागणारे सर्व मुख्य कीबोर्ड कि बघण्यासाठी इथे भेट द्या https://www.gnu.org/software/emacs/refcards/pdf/refcard.pdf
ईमॅक्स बफर:
ईमॅक्स मधे उघडलेली प्रत्येक फाईल ही बफर मधे उघडलेली असते. प्रत्येक बफरला स्वतःचे असे नाव असते व बफर मधे त्या संबंधीत फाईलचे शब्द साठवलेले असतात. ईमॅक्समधे बफर ही संपल्पना सगळीकडे वापरली जाते. तात्पुरते लिखाण करण्यासाठी Scratch हे बफर असते. मेसेज व वॉर्निंग बफर मधे ईमॅक्ससंबंधी विविध सुचना व एरर्स दिसतात.
ईमॅक्स मोडलाईन:
ईमॅक्समधील प्रत्येक बफरमधे खालच्या बाजुला एक मोड लाईन असते. या लाईनवर, सद्ध्या उघडलेल्या फाईलची माहिती, फाईलमधे आत्ता तुम्ही कोणत्या भागात आहात, वेळ, कोणते मोड चालु आहेत ई. माहिती दाखवलेली असते. कोणती माहिती दाखवायची हे कंफिगर करता येते.
ईमॅक्स पॅकेजेस व पॅकेज मॅनेजर:
ईमॅक्स हे मुक्तस्त्रोत सॉफ्टवेअर असुन ते आपल्या गरजेप्रमाणे सुधारीत करता येते. ईमॅक्सची कार्यक्ष्मता वाढवण्यासाठी विविध पॅकेजेस तयार केलेली असतात. वर्डप्रेस मधे जसे प्लगिन्स असतात तसेच साधारण हे पॅकेजेस असतात. असे पॅकेजेस ईन्स्टॉल करुन आपण ईंमॅक्स मधे नसलेली अनेक फिचर्स ईन्स्टॉल करु शकतो.
हे पॅकेजेस ईन्स्टॉल करण्यासाठी काही रिपोझिटरी असतात. MELPA व ELPA या दोन प्रसिद्ध सॉफ्टवेअर भांडार (Repositories) आहेत.
ईमॅक्स कन्फिगरेशन फाईल:
ईमॅक्समधील जवळ जवळ प्रत्येक गोष्ट आपल्या वयक्तीक आवडीनुसार व कामाच्य गरजेनुसार बदलता किंवा सुधारत येऊ शकते. हे सर्व कंफिगरेशन .emacs नावाच्या फाइलमधे लिहिलेले असते. ईमॅक्स चालु होताना ही फाइल सर्वप्रथम वाचली जाते व त्यानुसार ईमॅक्स कंफिगर करुन चालु केले जाते.
ईमॅक्स ईन्स्टॉल कसे करावे
ईमॅक्सच्या अनेक आवृत्त्या आहेत. या लेखात फक्त ग्नु ईमॅक्स याच ईमॅक्सचा विचार केलेला आहे. https://www.gnu.org/software/emacs/ या पानावर ग्नु ईमॅक्स बद्दल अधिक माहिती मिळेल.
विंडोजवर ईमॅक्स कसे इन्स्टॉल कसे करावे यासाठी इथे बघा https://www.gnu.org/software/emacs/download.html#windows.
लिनक्स मधे अधिकृत सॉफ्टवेअर स्रोतामधुन थेट ईन्स्टॉल करु शकता. जर तुम्ही डेबिअन पॅकेज मॅनजर असलेली लिनक्स वापरत असाल तर,
sudo apt-get update && sudo apt-get install emacs
ही कमांड रन करा किंवा जर तुम्ही आर.पी.एम बेस्ड लिनक्स वापरत असाल तर
sudo yum update && sudo yum install emacs
ही कमांड वापरा.
श्रेयः
ईमॅक्स लोगो https://commons.wikimedia.org/wiki/File:Emacs-logo.svg
It is great to see such articles in Marathi !
LikeLiked by 1 person