ईमॅक्स लेखमालेतील दुसरा लेख.  या भागात प्राथमीक शब्द संपादन कसे करावे ते पाहुया. लेख क्रं १ वाचण्यासाठी इथे भेट द्या.

ईमॅक्स चालु केल्यानंतर C-x F वापरुन नवीन बफर उघडा. हे बफर उघडतानाच त्याला एक नाव द्या.

  • ओळींमधे वर खाली व मागे पुढे

    ईमॅक्समधे ओळींमधुन वर खाली व मागे पुढे जाण्यासाठी नेहमीचे अ‍ॅरो व होम/एन्ड किज  वापरु शकता. पण याकामासाठी ईमॅक्सचे स्वतःचे किज आहेत.
    C-f एक अक्षर पुढे जा
    C-b एक अक्षर मागे जा
    M-f एक शब्द पुढे जा
    M-b एक शब्द मागे जा
    C-n एक ओळ खाली जा
    C-p एक ओळ वर जा
    C-a ओळीच्या सुरुवातीला जा
    C-e ओळीच्या शेवटी जा
  • ओळी व शब्द सिलेक्ट करणॅ

    कॉपीपेस्ट साठी किंवा विविध प्रकारचे बदल करण्यासाठी काही शब्द किंवा अनेक ओळी निवडाव्या लागतात. त्यासाठी त्या ओळीच्या किंवा शब्दाच्या सुरुवातीला कर्सर नेऊन, M-Space दाबा व त्यानंतर तो कर्सर त्या ओळीच्या किंवा शब्द समुहाच्या शेवटपर्यंत न्या. अशारीतीने तो भाग सिलेक्ट केला जाईल. या निवडलेल्या भागावर आता कॉपी पेस्ट किंवा इतर प्रक्रीया करु शकता.

  • शब्द किंवा ओळी कॉपी, कट व पेस्ट करणे

    वरील प्रमाणे तुम्हाला हवा तो शब्दसमुच्चय निवडुन झाल्यावर, तो फक्त कॉपी करण्यासाठी M-w दाबा. जर तुम्हाल कट पेस्ट करायचे असेल तर, कट करण्यासाठी C-w दाबा. यानंतर जिथे तुम्हाला हा भाग पेस्ट करायचा आहे, तिथे जाऊन पेस्ट करण्यासाठी C-y दाबा.

  • सिलेक्ट केलेल्या शब्दाला फॉरमॅट करणे
    त्या शब्द्याचा सुरुवातीला कर्सर न्या व All Caps करण्यासाठी M-u दाबा. All Small करण्यासाठी M-l दाबा.

  • शब्द शोधने व शोधलेले शब्द बदलणेसद्ध्याच्या फाईल मधे एखादा शब्द शोधण्यासाठी C-s दाबुन शब्द टाईप करा व परत एकदा C-s दाबा. हेच C-s परत दाबल्यानंतर त्या शब्दाच्या पुढच्या शोधावर कर्सर जाईल.
    M-x दाबुन

replace-string

ही कमांड टाईप करा व एन्टर दाबा. आता तुम्हाला जो शब्द बदलायचा आहे तो टाईप करा व एन्टर दाबा. त्यानंतर हा शब्द, ज्या शब्दाने बदलायचा आहे तो शब्द टाईप करुन एन्टर दाबा.

  • फाईल आणि बफर
    ईमॅक्समधे फ्रेम, बफर, विंडो व फाईल यांच्या व्याख्या थोड्या वेगळ्या आहेत.
    त्यापैकी बफर म्हणजे ज्याठिकाणी आपण शब्द संपादन करणार आहोत ती जागा व फाईल म्हणजे एखादा बफर जेव्हा एखाद्या फाईलला उघडुन त्यातील शब्द संपादत करतो त्या बफरला फाईल म्हणु शकता.
  • फाईल कशी उघडावी

    आधीपासुनच तयार असलेली फाईल उघडण्यासाठी C-x F दाबुन त्या फाईलचे पुर्ण स्थळ लिहा. लिनक्समधे होम डिरेक्टरी पुर्ण लिहिण्याएवजी
    ~

    लिहु शकता. उदा. जर तुमच्या Documents फोल्डरमधे असलेली test.txt ही फाईल उघडायची असेल तर, C-x F दाबल्यानंतर

  • ~/Documents/test.txt

    असे लिहुन Enter की दाबा.

  • नवी फाईल कशी तयार करावी

    एक नवे बफर तयार करण्यासाठी C-x B दाबुन नवे नाव टाईप करा. हेच बफर जर आता फाईल स्वरुपात सेव्ह करायचे असेल, तर C-x S दाबुन फाईलचे नाव द्या व Enter दाबा.
    थेट नवी फाईल तयार करुण्यासाठी C-x F दाबुन, फाईल जिथे सेव्ह करायची तिथले स्थळ लिहुन फाईलचे नाव लिहा. उदा. ~/Documents/test.py

  • फाईलमधे केले बदल सेव करणे
    जेव्हा तुम्हाला फाईल सेव्ह करायची असेल, तेव्हा C-x S दाबुन सेव्ह करु शकता.

  • सेव्ह अ‍ॅज कसे करावे?

    सध्या उघडी असलेली फाईल सेव्ह अ‍ॅज करण्यसाठी, C-x C-w दाबा व नवे नाव द्या. जुनी व नवी अशा दोन्ही फाईल सेव्ह केल्या जातील.

  • एकाच वेळेला दोन फाईल्स बघणे 

    ईमॅक्स विंडोला दोन उभ्या फ्रेम्स मधे विभागण्यासाठी C-x 3 दाबा. एका फ्रेम मधुन दुस-या फ्रेम मधे जाणासाठी C-x O दाबा. परत पहिल्या फ्रेममधे जाण्यासठी तीच की परत वापरा. दोन आडव्या फ्रेम्स मधे विभागण्यासाठी C-x 2 दाबा.

  • Comment

    Fill in your details below or click an icon to log in:

    WordPress.com Logo

    You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

    Facebook photo

    You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

    Connecting to %s

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.