युनिक्स/लिनक्स ओ.एस. वापरताना टर्मिनल खुप उपयोगी पडते. ग्राफिकल मेनु वापरण्याऐवजी, जर टरमिनल वापरले, तर वेगवेगळ्या कमांड रन करताना जास्त लवचिकता मिळते. सुरुवातीला लिनक्स शिकताना या टरमिनलची भिती असते आणि ते न वापरण्याकडे कल असतो. पण जसजसे आपण लिनक्स शिकत जातो तसे आपल्याला कळत जाते की टरमिनल वापरणे जास्त फायद्याचे आहे.

या नेहमीच्या टरमिनलची उपयुक्तता वाढवण्यासाठी व अधिकची माहिती दर्शवण्यासाठी लिक्विडप्रॉम्प्ट नावाचे मुक्तस्त्रोत सॉफ्टवेअर मदत करते. लिक्विडप्रॉम्प्ट Bash व Zsh दोन्ही शेल मधे चालते.

लिक्विडप्रॉम्प्टची काही वैशिष्ट्यः

  • व्हर्जन कंट्रोल रेपॉझिटरीची सद्य स्थिती, ब्रांच, कमीट न केलेले बदल आणि untracked फाईल्स दाखवणे
  • लॅपटॉप बॅटरी स्टेटस
  • screen किंवा tmux सेशन indicator
  • पायथॉन virtual environment
  • संक्षिप्त directory path

लिक्विडप्रॉम्प्टचे सर्व फिचर्स वापरण्यासाठी dependencies खालील प्रमाणे आहेतः

  • बॅटरीच्या स्थितीसाठी acpi
  • तापमान स्थितीसाठी acpi किंवा lm-sensors
  • screen or tmux

लिक्विडप्रॉम्प्ट इन्स्टॉल कसे करावे करण्यासाठी खालील कमांड वापरुन रिपॉझिटरी उतरवुन घ्या

git clone https://github.com/nojhan/liquidprompt.git

त्यानंतर सोर्स कमांड वापरुन लिक्विडप्रॉम्प्टला चालु सेशनमधे लोड करा

source liquidprompt/liquidprompt

टर्मिनलचा नेहमीचा प्रॉम्प्ट आता बदललेला असेल.

वरील नव्या प्रॉम्प्ट मधे आता फक्त संक्षिप्त पाथ दिसतोय. बॅटरी ड्रेन होतेय त्याचे लाल चिन्हही दिसतेय.

१०% बॅटरी शिल्लक असताना, चार्जींग चालू केले तेव्हा लाल चिन्ह जाऊन चार्जिंग दर्शवनारे पिवळे चिन्ह आले.

एखाद्या गिट रिपॉझटरीमधे गेल्यास, लोकल ब्रांच मधे किती नवे बदल झाले, रिमोटपेक्षा किती कमीटने मागे/पुढे आहे ही माहिती दिसते. सद्ध्या केलेले बदल कमिट केले नसल्याने खालील स्क्रिनशॉटमधे ब्रांचचे नाव लाल रंगात दिसत आहे.

गिट रिपॉझिटरीमधले सर्व बदल जर कमीट केले तर ब्रांचचे नाव हिरव्या रंगात दिसेल. अजुन हे बदल रिमोट ला पुश केले नसल्यामुळे एक * चे चिन्ह दिसत आहे.

सर्व फिचर्सची यादी इथे बघता येईल.
https://github.com/nojhan/liquidprompt#features

आपल्या गरजेप्रमाणे सेटींग बदलण्यासाठी व कन्फिगर करण्यासाठी माहिती इथे आहे: https://github.com/nojhan/liquidprompt#feature-configuration

Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.